Yogesh Rural Cancer Research & Relief Society's

Garud Hospital
Superspeciality Cancer Centre


Our Cancer Care Center

Patients are the focus of everything we do at Garud hospital informing them of all progress. Our mission is to advance patient care. We are best known for our leading edge cancer therapies and we take particular pride in the compassion and dedication of our doctors, nurses and other health care staff.

At Garud Hospital our sole focus is to cure cancer. We follow the current standards of care and treatment protocols for each type and stage of cancer. Our doctors have unprecedented expertise in diagnosing and treating all types of cancer and they use the latest technology and the most innovative, advanced therapies to increase the chances of a cure.

Care at our centre for your employees, whenever, the need arises, will be the best in class. Every effort will be made to address the needs of the patient, given his unique age and family needs. We at Garud Hospital believe in providing Cancer Treatment, to every patient, and with Compassion and Care with comfort always, relief often and cure many times.



  • तंबाखू,विडी,सिगारेट,मावा,गुटखा,दारू ही व्यसने,अयोग्य आहार-विहार.

  • गुणसूत्रे

  • हवेतील प्रदूषण,घातक रसायणे व्यायामाचा अभाव.

  • कॅन्सरविषयी गैरसमज टाळा:

  • कॅन्सर संसर्गजन्य नाही.

  • लवकर निदान व वेळेत पूर्ण उपचार झाल्यास कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो.

  • कॅन्सरमध्ये कधीही १००% खात्री देता येत नाही.


  • शरीरात कोठेही गाठ ,विशेषतः स्त्रीयांच्या स्तनाच्या जागी.

  • लघवी,संडास,थुंकीवाटे रक्त पडणे. .

  • स्त्रीयांच्या अंगावरून अनियमित व वरचेवर पांढरे जाणे किंवा लाल जाणे..

  • शरीरावरील कोणतीही विशेषतः तोंडातील जखम बरी न होणे. .

  • आवाजात बदल होणे,आवाज बसणे ,गिळण्यास त्रास होणे. .

  • संडास साफ न होणे,संडासाच्या सवयीत आकस्मित बदल होणे. .

  • शरीरावर पूर्वी असलेले तीळ व चामखीळ यांचा आकार वाढणे. .

  • भूक मंदावणे व वजन घटणे. .

    • स्तनावरील बदलाचे स्वपरीक्षण,डॉक्टरांकडून स्तनाचे परीक्षण,एक्सरे किंवा मॅमोग्राफी.

    • दुर्बिणीद्वारे आतड्याची / श्वासनलिकेची तपासणी, एफ. एन .ए. सी. बायोप्सी ,सोनोग्राफी ,सी.टी.स्कॅन /एम.आर. आय

    • तोंडाच्या कॅन्सरसाठी तपासणी -डिजिटल व्हिडीओ ओरोस्कोपी.

    • दुर्बिणीद्वारे कॅन्सरचे निदान.

    • स्त्री रोग चिकित्सा:

    • वंध्यत्व चिकित्सा

    • सरकार मान्य गर्भपात केंद्र

    • कुटुंब नियोजन केंद्र,सोनोग्राफी

    • हिस्टोरेक्टॉमी(गर्भ पिशवी काढण्याची )दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया.

    • पॅपस्मिअर ,डिजिटल व्हिडीओ कॉल्पोस्कोपी



     

       उपचार :

    • कॅन्सरवरील केमोथेरपी

    • कॅन्सरचे ऑपरेशन (सर्जरी )

    • रेडिएशन.

    • वरील उपचारापैकी काही किंवा सर्व उपचार पद्धती कॅन्सरमध्ये त्याच्या प्रकारानुसार वापराव्या लागतात.

         सर्जरी:

      कॅन्सरच्या उपचारामध्ये ऑपरेशन ही एक महत्वाची उपचार पद्धती आहे. शरीरावरील व शरीराच्या आतील कोणतीही गाठ
      व बाधित अवयव ,ऑपेरेशनद्वारे काढावा लागतो. हे कॅन्सरचे ऑपेरेशन इतर ऑपेरेशन पेक्षा वेगळे आणि मोठे असते.


     

    केमोथेरपी उपचार म्हणजे कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करणारी औषधे सलाईनद्वारे देणे.

    केमोथेरपीच्या उपचारांबद्दल इतर रुग्णांकडून किंवा त्याच्या नातेवाईकांकडून,काही गैरसमजाच्या गोष्टी ऐकून मनात बाऊं वा भीती निर्माण करून घेऊ नका . त्या संदर्भात तज्ञ डॉक्टरांच्या सल्ला घेवून ,आपल्या मनातील शंकांचे निरसन करा.

    केमोथेरपी चालू असताना पांढऱ्या व लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते,त्यासाठी कसल्याही पद्दतीचा जंतू संसर्ग होण्याचे टाळणे अत्यंत महत्वाचे आहे .

    केमोथेरपीच्या प्रत्येक डोस अगोदर ,रुग्णाच्या रक्ताची तपासणी केली जाते..हिमोग्लोबिनचे प्रमाण किमान ९ ग्राम % व पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण कीमान ४०००/मि .मि असणे गरजेचे आहे.


    रेडिओथेरपीची उपचार हा किरणांद्वारे केला जातो.एक्सरे काढताना जशी काहीही जाणीव होत नाही,
    तशी रेडिओथेरपी उपचार घेतांना त्याक्षणी काहीही त्रास होत नाही. यासाठी ऍडमिटची आवश्यकता नसते. कोणत्याही कॅन्सरमध्ये ,किती रेडिएशन घ्यायचे हे कॅन्सर तज्ञ ठरवितात. ही सुद्धा एक महत्वाची उपचार पद्धती आहे.





    केमोथेरपी / रेडिओथेरपी चालू असताना घ्यावयाची काळजी

    • उकळून थंड केलेले पाणी भरपूर प्रमाणात पिणे. घरी शिजवलेले ताजे शाकाहारी जेवण घेणे. बाहेरील सर्वप्रकारचे खाद्य पदार्थ टाळावेत.
    • सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या व डाळभात,यासारखे पौष्टिक अन्न खाणे,सालीचे फळ साल काढून खावेत. सालीसकट खाऊ नयेत. ज्या फळांची साल काढता येत नाही.ती फळे टाळावीत.
    • तोंड आलेले असल्यास अति गरम अथवा थंड पदार्थ खाऊ नका. शक्यतो तिखट व मसालेदार पदार्थ टाळा.
    • मळमळ व उलटी होत असल्यास रोजचे अन्न टप्याटप्यात विभागून खाणे.
    • कोमट पाण्यात थोडासा खाण्याचा सोडा,मीठ,किंवा माऊथ वॉश घालून दिवसातून कमीत कमी चार वेळा गुळण्या कराव्यात.
    • धूळ व धूर यांचा संपर्क टाळा,ताप,खोकला,सर्दी व जुलाब ,अशा रुग्णांचा सहवास /संपर्क टाळा.
    • मऊ ब्रश वापरून दिवसातून दोन वेळा दात घासावेत.
    • दररोज गरम पाण्याने खांद्या वरून अंघोळ करणे.(डोके भिजवू नये ).जेवणापूर्वी व शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे.
    • स्वतःच औषधे घेऊ नका. कुठल्याही त्रास झाल्यास,शक्यतो कँसर हॉस्पिटलध्येच तपासणी करून घेणे.
    • कॅन्सरची औषधे धोकादायक औषधे असतात. उपचार करणाऱ्या कँन्सर तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच घेणे आवश्यक आहे.
    • डॉक्टरांनी दिलेल्या तारखेलाच केमोथेरपी घ्यावी. विनाकारण विलंब करू नये.
    • केमोथेरपी पूर्ण घेतलेल्या किंवा चालू असलेल्या रुग्णांनी आपल्या सहकारी रुग्नांना मार्गदर्शन करून,धीर द्यावा व त्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मदत करावी. कॅन्सरमुक्त झालेल्या अनेक व्यक्ती आहेत. त्यांनी कॅन्सरचे उपचार घेत असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढवावे.

    • * तातडीने दवाखान्यात येण्याबद्दल सूचना *
    • उपचार नंतर , घरी गेल्यावर काहीही त्रास झाला,तर ताबडतोब तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

    • * फेर तपासणी बाबत सूचना *
    • उपचार चालू असताना दर १० दिवसांनी / उपचार पूर्ण झाल्यानंतर २ वर्षापर्यंत महिन्यातून एकदा /२ वर्षांनंतर दर तीन महिन्यांनी ५ वर्षे पर्यंत ५ वर्षानंतर दर ६ महिन्यांनी ता[तपासणीसाठी यावे.